प्राचीन भारतीय कल्पना
प्राचीन भारतीयांनी इतिहासलेखन असे फारसे केलेच नाही. तथापि इतिहासाविषयी, कालप्रवाहाविषयी, स्थित्यंतरे आणि त्यामागील सूत्रे ह्या अनुरोधाने पुष्कळ विवेचन ऋग्वेदकालापासून पुढे कित्येक शतके केलेले दिसते. इतर प्राचीन संस्कृतींप्रमाणे भारतातही दैवी शक्तीवर विश्वास होताच. निसर्गात बदल घडविणाऱ्या देवता मानवी जीवनाच्याही नियंत्रक होत्या. तेव्हा कर्ताकरविता परमेश्वर, माणसे म्हणजे त्याच्या हातातील बाहुली ही कल्पना आलीच. आपण काहीतरी करतो आणि …